Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, June 13, 2021

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती योग्यता

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2018

महाराष्ट्र पोलीस

हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १० पोलीस आयुक्तालये व ३५ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

         भारतातील गणनेत महाराष्ट्र हे तिसरे मोठे राज्य आहे. देशातील सर्वात मोठया पोलीस दलांपैकी एक आहे. राज्य कॅडरमध्ये भरलेल्या 302 भारतीय पोलीस सेवा अधिकार्यांखेरीज 282 पोलिस अधीक्षक, 523 उपनिरीक्षक पोलिस, 3522 निरीक्षक, 3123 सहायक पोलीस निरीक्षक, 6230 उपनिरीक्षक आणि 1,80,550 पुरुष (कॉन्स्टबुलरीचे सदस्य) यांचा समावेश आहे.

         मोठ्या नागरी समूहांसह महाराष्ट्र एक उच्च उद्योगित राज्य असून त्यांनी मोठ्या शहरांतील पोलिसांची कारवाई करण्यासाठी आयुक्तालयाच्या यंत्रणेचा स्वीकार केला आहे. राज्यातील 10 कमिशनर आणि 35 जिल्हा पोलीस गट आहेत. महाराष्ट्र पोलीस विभागातील विशेष एकके तसेच या विभागाचे तपशील उप-प्रमुख "जिल्हे आणि आयुक्तालय आणि मुख्य पृष्ठाच्या मेन्यू बारवर" एमपीडीच्या विशेष एकके अंतर्गत उपलब्ध आहेत.

         महाराष्ट्र पोलिसांचा आदर्श वाक्य आहे. याचा अर्थ असा होतो की, महाराष्ट्र पोलीस बेईमानीचे संरक्षण व संरक्षण व संरक्षण करण्याचे वचनबद्ध आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांचे प्रमुख आहेत. राज्य पोलिस मुख्यालय मुंबईत स्थित आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती बोर्ड तर्फे दरवर्षी रिक्त जागांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन काढले जाते. पोलीस कॉन्स्टेबल , फायरमन , ड्राइव्हर , महिला हेड कॉन्स्टेबल इत्यादी पदांच्या भरती साठी भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलीस भरती प्रक्रियेचे ऑफिसिअल नोटिफिकेशन www.mahapolice.gov.in ह्या संकेत स्थळावर उपलब्ध होते. इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी ऑफिसिअल संकेतस्थळा ला देत रहावे जेणे करून योग्य परिपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील. पोलिस भरतीचे शैक्षणिक शारीरिक निकष आपण थोडक्यात जाणूण घेऊया.

शैक्षणिक पात्रता

१२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा

१८ ते २८ पर्यंत. SC/ST साठी + तर OBC साठी + वर्षे सवलत, खेळाडू वर्षे सवलत.

निवड पद्धत

शारीरिक पात्रता चाचणी , कागदपत्रे तपासणी , शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

 शारीरिक मोजमाप चाचणी

उंची
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी

छाती
पुरुष : फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती

 शारीरिक क्षमता चाचणी निकष :

 पुरुष :
1600
मी. अंतर धावणे.

·         4 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण

·         4 मी. 50 से. ते 5 मी. 10 से. – 18 गुण

·         5 मी. 10 से. ते 5 मी. 30 से. – 16 गुण

·         5 मी. 30 से. ते 5 मी. 50 से. – 14 गुण

·        5 मी. 50 से. ते 6 मी. 10 से. – 12 गुण

·        6 मी. 10 से. ते 6 मी. 30 से. – 10 गुण

·         6 मी. 30 से. ते 6 मी. 50 से. – 6 गुण

·        6 मी. 50 से. ते 7 मी. 10 से. – 2 गुण

·         7 मी. 10 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण


100 मी. धावणे (11.50 सेकंद ) : 20 गुण,

 

·         11. 50 से. किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण

·         11. 50 से. ते 12.50 से. – 18 गुण

·        12.50 10 से. ते 13.50 से. – 16 गुण

·         13.50 से. ते 14.50 से. – 14 गुण

·         14.50 से. ते 15.50 से. – 10 गुण

·         15.50 से. ते 16.50 से. – 6 गुण

·        16.50 से. ते 17.50 से. – 2 गुण

·         17.50 से. पेक्षा जास्त – 0 गुण

 गोळा फेक (7.50 किग्रॅ) : 20 गुण ,

·         8.50 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण

·         7.90 मी. ते 8.50 मी. – 18 गुण

·         7.30 मी. ते 7.90 मी. – 16 गुण

·         6.70 मी. ते 7.30 मी. – 14 गुण

·         6.10 मी. ते 6.70 मी. – 12 गुण

·         5.50 मी. ते 6.10 मी. – 10 गुण

·         4.90 मी. ते 5.50 मी. – 8 गुण

·         4.30 मी. ते 4.90 मी. – 6 गुण

·         3.70 मी. ते 4.30 मी. – 4 गुण

·         3.10 मी. ते 3.70 मी. – 2 गुण

·         3.10 मी. पेक्षा कमी – 0 गुण

 

 लांब उडी : 20 गुण,

·         5 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 20 गुण

·         4.75 मी. ते 5.00 मी. – 18 गुण

·         4.50 मी. ते 4.75 मी. – 16 गुण

·         4.25 मी. ते 4.50 मी. – 14 गुण

·         4.00 मी. ते 4.25 मी. – 12 गुण

·         3.50 मी. ते 4 मी. – 9 गुण

·         3 मी. ते 3.50 मी. – 6 गुण

·         2.50 मी. ते 3.00 मी. – 3 गुण

·         2.50 मी. पेक्षा कमी – 00 गुण

10 पूलअप्स

·        10 पूलअप्स : 20 गुण

·         10 पुलअप्स – 20 गुण

·         9 पुलअप्स – 16 गुण

·         8 पुलअप्स – 12 गुण

·         7 पुलअप्स – 8 गुण

·         6 पुलअप्स – 4 गुण

·         5 पुलअप्स – 2 गुण

·         5 पेक्षा – 0 गुण

 

             महिला : 800 मी.

 

·        2 मी. 40 से. किंवा त्यापेक्षा कमी – 25 गुण

·        2 मी. 40 से. ते 2 मी. 50 से. – 22 गुण

·        2 मी. 50 से. ते 3 मी. – 18 गुण

·       3 मी. ते 3 मी. 10 से. – 14 गुण

·        3 मी. 10 से. ते 3 मी. 20 से. – 10 गुण

·        3 मी. 20 से. ते 3 मी. 30 से. – 6 गुण

·        3 मी. 30 से. ते 3 मी. 40 से. – 4 गुण

·        3 मी. 40 से. ते 3 मी. 50 से. – 2 गुण

·        3 मी. 50 से. किंवा त्यापेक्षा जास्त – 0 गुण

·       100 मी. धावणे (14 सेकंद ) : 25 गुण,

·        15 से. – 22 गुण

·        16 से. – 18 गुण

·        17 से. – 14 गुण

·        18 से. – 10 गुण

·        19 से. – 6 गुण

·        20 से. – 2 गुण

 

 गोळा फेक (4 किग्रॅ) : 25 गुण,
⚫ 

·       6.00 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण

·        5.50 मी. ते 6.00 मी. – 20 गुण

·        5.00 मी. ते 5.50 मी. – 15 गुण 

·       4.50 मी. ते 5.00 मी. – 10 गुण

·        4.00 मी. ते 4.50 मी. – 5 गुण

·        4 मी. पेक्षा कमी – 0 गुण

 

 लांब उडी : 20 गुण, 

·       3.80 मी. किंवा त्यापेक्षा जास्त – 25 गुण 

·       3.50 मी. ते 3.80 मी. – 21 गुण 

·       3.20 मी. ते 3.50 मी. – 18 गुण 

·       2.90 मी. ते 3.20 मी. – 15 गुण

·        2.60 मी. ते 2.90 मी. – 12 गुण 

·       2.30 मी. ते 2.60 मी. – 9 गुण

·        2.00 मी. ते 2.30 मी. – 6 गुण 

·       1.70 मी. ते 2.00 मी. – 3 गुण 

·       1.70 मी. पेक्षा कमी – 00 गुण

 

लेखी चाचणी ( १०० गुण)

जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळून पूर्ण करतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १: १५ या प्रमाणत प्रवर्गनिहाय उमेदवारांना १०० गुणांच्या लेकी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समवेश असेल :-

  1. अंकगणित
  2. सामान्यज्ञान व चालू घडामोडी
  3. बुद्धिमत्ता चाचणी
  4. मराठी व्याकरण

लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील.

अर्जदारासाठी आवश्यक सूचना…..

अर्जदाराने अर्जासोबत खालील (लागू असलेल्या ) प्रमाणपत्रांच्या सुस्पष्ट दिसतील अशा सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे.

  1. शाळा सोडल्याचा दाखला.
  2. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक.
  3. जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणीचे वैधता प्रमाणपत्र.
  4. प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र.
  5. अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र
  6. सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेले निकष व अटीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमिलियर) निकटतम वर्षाचे कालावधीचे प्रमाणपत्र.
  7. विविध आरक्षण प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवाराने संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र.
  8. सर्व अटींची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे उमेदवार सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
  9. सदर पोलीस भरतीची विस्तृत माहित www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर, तसेच पोलीस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर उपलब्ध राहील.
  10. पोलीस भरतीतील प्रत्येक प्रक्रियेबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
  11. पोलीस भरतीतील प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा /नुकसान झाल्यास त्यास शासन जवाबदार राहणार नाही.
  12. भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार अवलंब केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

****************************************************************************

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages