Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, June 14, 2021

पोलीस भरती - चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?

पोलीस भरती - चालू घडामोडी काय वाचायला पाहिजे?

 

चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि  आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.

काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?”

असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?

सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?

१ जानेवारी २०17 ते 15 मार्च 2018 ह्या दरम्यान च्या चालू घडामोडी वर प्रश्न येवू शकतात.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.

सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे हे मी अगोदरच्या पोस्ट्स मध्ये सांगितलंच आहे.

 

1 जानेवारी 2017  ते 15 मार्च 2018 ची ही सर्व वर्तमानपत्रे (लोकसत्ता, दिव्य मराठी, एकोनोमीक टाईम्स, महाराष्ट्र टाईम्स). हो, लक्ष द्या: ही सर्व वर्तमानपत्रे दररोज वाचून त्यावर स्वत:चे नोट्स काढा. हे सर्व करायला दररोज दोन ते तीन तास जातील, ते चालेल. हे केले नाही तर परीक्षेचा पेपर बघून मग बोंबा नका मारू.:)

 

वरील स्त्रोत्रातून काय  वाचायला  पाहिजे?

§  भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक  स्तरावरील घडामोडी

§  आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी

§  समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे

§  बजेट व त्याशी संबंधित घडामोडी

§  फिल्मी अवार्ड्स

§  इतर

 

कृपया हे लक्षात घ्यावे कि चालू घडामोडी हा विस्तीर्ण विषय आहे आणि ह्यामध्ये सुर्याखाली जे काही आहे त्यावर प्रश्न विचारले जावू शकतात. निश्चित असा अभ्यासक्रम नाही ह्या विषयासाठी.

चालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये!

 

खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचावेत:

§  नवीन कायदे, बिल्स (उदा. महिलांसाठी आरक्षण)

§  इ-गावार्नंस (e -governance), प्रशासनिक फेरफार, सरकारच्या वेग वेगळ्या योजना

§  डीम्ड-युनिवर्सितींशी (Deemed -University) संबंधित व इतर शिक्षणाशी संबंधित बातम्या

§  आंतरराष्ट्रीय घडामोडी, वेग वेगळ्या देशांशी केलेले करार, भारताचे आजूबाजूच्या देशांशी असलेले वाद, सार्क[SAARC ], ओपेक[OPEC ], एशियन[ASEAN], चोग्म [CHOGM], सारख्या ओर्गानाय्झेशानांशी संबंधित बातम्या, आंतरराष्ट्रीय निवडणुका बद्दल बातम्या.

§  भारतीय सेनेच्या दुसऱ्या राष्ट्रांसोबत झालेल्या सैनिकी सामान खरेदी करार, सैनिकी ऑपरेशन्स, इत्यादी

§  भारतीय आर्थिक बातम्या- जसे, सरकारच्या पोलिसिज, मोठ्या कंपन्या व त्यांचे बॉस, भारतीय बजेट, चालू पंच वार्षिक योजनांचे आराखडे व त्यात घडून येणार बदल. रुपयाचे दुसऱ्या देशांच्या नाणे शी होत असलेले बदल, दुसऱ्या देशांशी आर्थिक संबंध व नवे करार.

§  नवे रोग व त्यावर होणारे उपाय , स्वाईन फ्लू, एड्स, इत्यादींवर नवीन उपचाराशी निगडीत बातम्या, सोलर एनर्जी, वातावरणाशी संबंधित होणारे बदल व त्यासाठी करण्यात येणार बदल. उपग्रह व नवनवीन मिशन्स, बायोतेक्नोलोजीशी संबधित बातम्या, हायब्रीड बीज उपक्रम, इत्यादी.

§  अवार्ड्स कुणाला मिळालेत व कशासाठी: नोबेल पीस प्रायीज, भारतरत्न, खेळांशी संबंधित अवार्ड्स, न्याशाणाल अवार्ड्स, स्पोर्ट्स अवार्ड्स.

§  संडेच्या न्यूजपेपर मध्ये नवीन बुक्स व त्यांचे लेखकाबद्दल माहिती येत असते तर ते लिहून ठेवणे.

§  tennis खेळाशी संबंधित बातम्या, क्रिकेट वर फार कमी प्रश्न असतात तर बाकी दुसऱ्या खेळा विषयीच्या बातम्या.

§  भौगोलीक बदल, त्याची कारणे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम. ह्यावर करण्यात आलेले व करण्यात येणार उपाय, इत्यादी.

खाली दिलेले मुद्दे महत्वाचे नसल्यामुळे पोलीस भरतीमध्ये त्यावर प्रश्न येत नाहीत:

§  राजनीतिक पार्ट्या व त्यांचे दलबदलू धोरण. राजनैतिक नेत्यांची भाषणे व एकमेकांवरच्या टीका

§  टेररिस्ट ग्रुप्स, माओवादी ग्रुप्स, उल्फा व त्यांचे हल्ले, इतर आतंकवादी संघटन.

§  अक्सीडेनट्स, नवीन ट्राफिक रुल्स, इत्यादी

§  चोरी व इतर गुन्हे, ह्याप्रकारच्या घटना

§  क्रिकेट, बॉलीवूड बातम्या, फिल्मी गपशप, इत्यादी

 

आता सर्वात महत्वाचा प्रश्न. एखाद्या उमेदवाराच्या मनात नक्कीच खालील प्रश्न येवू शकतो.

जर का मी न्यूजपेपर्स वाचलेच नाहीत तर काय होणार, कुणी मला फाशीवर चढवेल का? का बर मी इतकी मेहनत घ्यावी आणि दररोज १-२ न्यूजपेपर्स वाचून , मग त्यावर नोट्स काढावेत, का पण? माझ काय डोक-बिक फिरलंय का एक वर्षभर ह्या बातम्या लिहून ठेवू?

परीक्षेच्या आधी काही दिवस, चालू घडामोडीवर एक झक्कास लेटेस्ट पुस्तकं घेईन आणि खूप अभ्यास करीन वेळेवर, तेव्हाच लक्षात राहील न!  हे काय आतापासून टेन्शन घेत बसायचं! छ्या..

 

नाही, कुणीच फाशीवर चढवणार नाही. I repeat again and again, नाही, कुणीच फाशीवर चढवणार नाही. घ्या तुम्ही वेळेवर एखाद हे जाड पुस्तकं आणि बसा घेवून समोर. जसजशी परीक्षा तोंडावर येईल तसतसा घाम सुटेल, टेन्शन वाढेल, काय वाचू आणि काय नाही असं होईल. आणि  नेहमीसारखं घडेल: ते पुस्तकं सगळ वाचून होणार नाही.

म्हणून जीव तोडून सांगतो, आता तरी उठा, जागे व्हा झोपेतून आणि परीक्षेच्या तयारीला लागा. कशाची वाट बघता काय माहित. तो मोबाईल सोडा बस झालेत तुमचे SMS करणं आणि गाणे ऐकणं. पुरे आता.

नेहमी परीक्षा झाल्यावर पश्चाताप करता आणि ठरवता की नाही यार आता तरी खूप अभ्यास करीन आणि पुढच्या परीक्षेत नक्कीच क्लियर होईन, आई शपथ यारपण तुमची  ती जुनी सवय अजूनही गेली नाही ना! करो, ऐश करो, तुमचं काय जाणार, जाणार ते आई-बापाचे पैसे जाणार ना!

जेव्हा तुमचे अति महत्वाचे वर्ष वाया जातील तेव्हा बराच उशीर झालेला असेलपण तेव्हाखूप उशीर झालेला असेल!!!

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages